एकीकडे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आजपासून म्हणजेच २५ जुलैपासून राज्यात ‘आरक्षण बचाव यात्रा’ काढणार आहेत. यात्रेत सहभागी होण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी राजकीय नेत्यांना निमंत्रण दिलं आहे.
राष्ट्रवादीचे(शरद पवार) प्रमुख शरद पवार, मंत्री छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, आमदार पंकजा मुंडे आणि ओबीसी सेवा संघाचे प्रदीप ढोबळे यांना आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आलंय. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांचं निमंत्रण स्वीकारून हे नेते आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लागले आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे राजकारण सध्या सुरू असून, जातीय संघर्ष वाढत असल्याने राज्यात सलोखा निर्माण व्हावा आणि आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारकडे ६ मोठ्या मागण्या केल्या आहेत. ओबीसी आरक्षण वाचले पाहिजे. Sc /St विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दुप्पट झाली पाहिजे. ओबीसी विद्यार्थ्यांना सुद्धा SC/ST प्रमाणे शिष्यवृत्ती मिळते, ती जशीच्या तशी लागू झाली पाहिजे. SC, ST आणि OBC ला पदोन्नतीत आरक्षण मिळाले पाहिजे. 100 ओबीसी आमदार निवडून आणणे. ५५ लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावी, अशी आरक्षण बचाव यात्रेचे उद्दिष्ट्ये आहे.















Discussion about this post