जळगाव । जळगाव शहरासह जिल्ह्यात वाहन चोरट्यांनी धुमाकूळ घेतला आहे. दिवसेंदिवस वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून यामुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शहरातील आयोध्यानगरातुन अज्ञात चोरट्यांनी कार चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
असोदा येथील रहिवासी पराग चंद्रकांत पाटील (वय ३०) यांचे असोदा ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी किरणा दुकान आहे. त्यांनी नुकतीच कार घेतली होती. गावात गाडी लावायला जागा नसल्याने त्यांनी जळगाव शहरातील आयोध्यानगरात राहणाऱ्या मामाच्या घराबाहेर कार (एमएच १९, बीयू ०५००) पार्क करीत होते.
त्यांनी बुधवारी (ता. १४) कार आयोध्यानरातील त्यांचे मामा कृष्णा शिंदे यांच्या घरासमोर पार्किंगमध्ये उभी केली. रात्री एकनंतर चोरट्यांनी कार चोरून नेली. याबाबत पराग पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहे.















Discussion about this post