पुणे । बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून रखडला असून यामुळे शेतकरी चिंतेत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे थकले. याच थकलेल्या नजरेने अजूनही तो पाऊस येण्याची वाट पाहत आहे. दरम्यान, मान्सून पुन्हा एकदा लांबण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता 23 जूननंतर पावसाला पुन्हा सुरुवात होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
सध्या राज्यासह देशात होणारा पाऊस हा चक्रीवादळाचा होणार परिणाम आहे. मान्सून सध्या स्थिरावला असून 23 जूनला महाराष्ट्र आणि मध्य भारतात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान, दक्षिण आणि ईशान्य भारतात 18 ते 21 जून दरम्यान पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचं आगमन होतं मात्र यावर्षी मान्सूनच्या प्रवासाची गती मात्र थंडावली आहे. निम्मा जून महिना उलटून गेला तरी अद्याप मान्सून सक्रिय नसल्याने शेतकऱ्याच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत राज्यातही अनेक भागात अद्याप मान्सून दाखल झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली आहे. विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना अजून पावसाची वाट पाहावी लागणार आहे.















Discussion about this post