डिफेंस रिसर्च अँडेवलपमेंट ऑर्गनाइजेशनने (DRDO) मध्ये नोकरीची संधी आहे. DRDO अप्रेंटिस पदासाठी भरती काढली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
पात्र उमेदवार डीआरडोच्या अधिकृत वेबसाईटव drdo.gov.in अर्ज करू शकतात. डीआरडीओच्या भरती मोहिमें अंतर्गत ६२ अप्रेंटीस पदांसाठी भरती होणार आहे. या भरतीसाठीची नोंदणी प्रक्रिया १३ जूनला सुरू झाली आहे २८ जून २०२३ पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. या पदाच्या पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या माहिती जाणून घ्या
रिक्त जागांचा तपशील
ग्रॅज्युएट अप्रेंटीस- २८ पदे
डिप्लोमा अप्रेंटीस -१३ पदे
ट्रेड अप्रेंटीस – ११ पदे
पात्रता
जे उमेदवार २०२३-२४ दरम्यान ग्रॅज्युएट, डिप्लोमा किंवा आयटीआय सर्टिफिकेट कोर्स उतीर्ण झाले आहेत ते डिआरडीओच्या या अप्रेंटीस भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच जे नियमितपणे वर्ष २०२१, २०२२ आणि २०२३ मध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केले आहे ते देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पीजी योग्यता असलेल्या भरतीसाठी योग्य मानले जात नाही.
निवड प्रक्रिया :
डिआरडीओ अप्रेंटीस भरतीसाठी उमेदवारांची निवड अकॅडमिक मेरिट किंवा लेखी परिक्षा किंवा मुलाखती द्वारे केली जाईल. याआधी योग्य उमेदवारांची निवड कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाते.
अखेर निवड झालेल्या उमेदवारांना वैध पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल. हे प्रमाणपत्र पोलीस ठाण्याचे कायमस्वरूपी वास्तव्याचा पत्ता किंवा गेल्या एक वर्षाच्या वास्तव्याचा पत्ता असावा. अधिक तपशिलांसाठी उमेदवार डीआरडीओची वेबसाइटही पाहू शकतात.
Notification : Download Here
Discussion about this post