नवी दिल्ली । देशात NEET पेपर लिक प्रकरणात लोखो विद्यार्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. NEET पेपर लीकप्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने NTA ला महत्त्वाचे आदेश दिले आहेत. शनिवारी दुपारी १२ पर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. ढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 22 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे.
आजच्या सुनावणीत कोर्टाने सर्व विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेता येणार नाही. संपूर्ण परीक्षेवर पेवरफुटीचा विपरीत परिणाम झाला आहे, याला ठोस आधार असल्याशिवाय फेरपरीक्षेचा आदेश देवू शकत नाही असं असं सरन्यायाधीश CJI DY चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.
तसेच NTA ला येत्या शनिवारपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाइटवर प्रकाशित करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. शहरे आणि केंद्रानुसार आकडेवारी जाहीर करावी पण हे करताना विद्यार्थ्यांची ओळख लपवावी. पुढील सुनावणी सुप्रीम कोर्टात 22 जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. पेपर फुटला होता यात शंका नाही, पण फेरपरीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.
Discussion about this post