उत्तर प्रदेशातील गोंडा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे रेल्वे अपघात झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी चंदीगडहून गोरखपूरमार्गे आसाममधील दिब्रुगडला जाणाऱ्या चंदीगड एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले. यावेळी प्रवाशांमध्ये आरडाओरड झाली.या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेची माहिती तात्काळ रेल्वे नियंत्रण कक्षाला देण्यात आली. अपघातानंतर या मार्गावर येणाऱ्या सर्व गाड्या विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक १५९०४ दिब्रुगड एक्स्प्रेस ही आज दुपारी २ च्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही वेळातच दुपारी २.३० च्या सुमारास गोंडापासून २० किमी अंतरावर या ट्रेनला अपघात झाला. या अपघातात ट्रेनचे दोन डबे रुळावरून पूर्णपणे घसरले. तर इतर काही डबेही अपघातग्रस्त झाले. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशी जीव मुठीत धरून बाहेर पडले. या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रेल्वे अपघाताची माहिती घेतली आणि अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. अपघातग्रस्त डब्यांमधून प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. मात्र या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Discussion about this post