मुंबई । राज्यातील काही भागात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र दुसरीकडे काही भागात मुसळधार पाऊस सुरू असून अशातच हवामान खात्याने पुढील काही तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे.१७ जुलै ते १९ जुलै या कालावधीत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने जारी केलेला आहे. मुंबईत सध्या ऑरेंज अलर्ट असून आज मुसळधार पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना अलर्ट
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट कायम आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात आधीच पूरस्थिती निर्माण झाली आहेय. रत्नागिरीलाही रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती आणि सातारा हे जिल्हे ऑरेंज अलर्टखाली आहेत.पुढील चार ते पाच दिवस कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. अधिकारी हाय अलर्टवर आहेत, परिस्थिती व्यवस्थापित करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहेत.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे आज विदर्भात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील (Rain Alert) चार दिवसांचे महत्त्व सतत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर केरळ, गोवा, कर्नाटक आणि गुजरातसाठीही अलर्ट जारी करण्यात आलेत.
Discussion about this post