जळगाव । रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक रेल्वे गाड्यांना जनरल डबे कमी असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. यातच रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यांमध्ये जनरल डबे वाढवण्याचा निर्णय घेतला.
ऑक्टोबर महिन्यापासून भुसावळ मार्गे धावणाऱ्या ४ एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४ जनरल डब्यांची सुविधा देण्यात येणार आहे. आता एक्सप्रेसला समोर दोन आणि मागच्या बाजूला दोन असे एकूण चार जनरल डबे असतील, त्यामुळे जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी आता कमी होणार आहे. रेल्वे गाड्यांमध्ये अनारक्षित अर्थात जनरल डबे कमी असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास मोठा धकाधकीचा ठरतो. बहुतांश गाडधांमध्ये केवळ दोनच जनरल डबे आहेत.
या तारखेपासून जादा डबे
२६ ऑक्टोबरपासून १३४२५ मालदा टाउन-सूरत एक्स्प्रेस, २८ ऑक्टोबर १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस, ७ डिसेंबरपासून २२५१२ कामाख्या-एलटीटी एक्सप्रेस, १० डिसेंबर २२५११ एलटीटी-कामाख्वा एक्सप्रेस, २९ नोव्हेंबरपासून २०८५७ पुरी-साईनगर शिर्डी एक्सप्रेस, १ डिसेंबरपासून २०८५८ साईनगर
शिर्डी-पुरी एक्सप्रेस, २६ नोव्हेंबरपासून २२८६६ पुरी-एलटीटी एक्सप्रेस, २८ नोव्हेंबरपासून २२८६५ एलटीटी-पुरी एक्सप्रेस.
Discussion about this post