नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून न्यायालयामध्ये झालेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.
या प्रकरणात अजित पवार गटाने दोन आठवड्यात उत्तर सादर करावे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचे असल्यास एक आठवड्यात शरद पवारांनी ते दाखल करावे, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.
दरम्यान, २ आठवड्यात अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टाने उत्तर द्यावं आणि त्यानंतर एक आठवड्यात आम्ही उत्तर द्यावं अस कोर्टाने आज सांगितले आहे. ६ ऑगस्टला यावर सुनावणी होईल अस कोर्टाने सांगितले आहे. कोर्टाने आज टाईमलाईन घालून दिली आहे. आमची अपेक्षा आहे की ४-५ सुनावण्यात निकाल लागेल, असे महत्वाचे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
Discussion about this post