पंढरपूरकडे जाणारा ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला आहे. बस मागून ट्रॅक्टरला आदळून दरीत कोसळली. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला. तर पाच जणांची प्रकृती गंभीर असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डोंबिवलीकडून पंढरपूरला यात्रेसाठी जात होते. पहाटेच्या वेळी अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. त्यानंतर बस 20 फूट खाली दरीत कोसळली. अपघातासंदर्भात नवी मुंबईचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले की, सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर अपघात झाला.
एका खासगी बसमधून 54 जण आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जात होते. प्रवाशांनी भरलेली ही बस ट्रॅक्टरला धडकली. त्यानंतर बस दरीत पडली. अपघातात जखमी झालेल्या 42 जणांना एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे, तर इतर तीन जणांना शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
#WATCH | Mumbai | Four people died and several others were injured after a bus collided with a tractor and fell into a ditch near the Mumbai Express Highway. All the injured were admitted to the nearby MGM Hospital: Pankaj Dahane, DCP Navi Mumbai Police
The bus with devotees… pic.twitter.com/4HY3vdPVEp
— ANI (@ANI) July 15, 2024
भाविकांनी भरलेली बस डोंबिवलीतील केळझर गावातून पंढरपूरला जात होती. मुंबई एक्स्प्रेस हायवेजवळ या बसने एका ट्रॅक्टरला धडक दिली. त्यावेळी घटनास्थळी चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आणखी एका जणाचा मृत्यू झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Discussion about this post