मुंबई । मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामिनावर बाहेर असलेले राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांना न्यायालयाने आणखी दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक सध्या जामिनावर बाहेर आहेत. आज नवाब मलिक यांच्या जामिनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडून जामीनावर मुदतवाढ मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला होता.
नवाब मलिक यांच्या या अर्जावर सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिक यांच्या जामीनाला आणखी दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे. २०२२ मध्ये कथित गोवावाला कंपाऊंड प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर २०२३ मध्ये ते आरोग्याच्या कारणामुळे जामिनावर बाहेर आले होते.
दरम्यान, नवाब मलिक यांनी राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीलाही हजेरी लावली होती. आज विधानभवनात दाखल होत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे मलिक यांनी नेमकं मतदान कुणाला केलं? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
Discussion about this post