जळगाव । गेल्या अनेक दिवसापासून जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला असून आज जळगावसह १० जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रविवारी रात्री जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. दरम्यान, हवामान खात्याकडून आजही जळगावसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात वेळेआधीच मान्सून दाखल झाला होता. सुरुवातीच्या आठवड्यात दमदार बॅटिंग केल्यानंतर मान्सूनची चाल अचानक संथ झाली. परिणामी अनेक भागात पावसाची तूट राहिली. यामुळे अनेक ठिकाणी पेरण्या देखील खोळंबल्या होत्या यामुळे शेतकरी चिंतेत होता यातच राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली.
कुठे कोसळणार पाऊस?
आज जळगाव, धुळे, नंदुरबारसह मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या १० जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, पावसाची शक्यता पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच आज २४ जूनपासून आठवडाभर खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा अंदाज सेवानिवृत्त ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला















Discussion about this post