चाळीसगाव । जळगाव लोकसभा निवडणुकीनंतर द्वेषाच्या राजकारणाने खालची पातळी गाठली आहे. चाळीसगाव भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या धमकीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर आता व्हायरल होताना दिसत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन सुरू असताना ज्येष्ठ नेते आणि माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मंगेश चव्हाण यांना चॅलेंज आहे त्यांनी या मतदारसंघातून निवडून येऊन दाखवावं. छत्रपतींची शपथ घेऊन सांगतो मी त्यांना संपवून टाकेल,
भाजप आमदारास गोळ्या घालण्याची धमकी… pic.twitter.com/lGnacHiuk3
— jitendra (@jitendrazavar) June 23, 2024
माझं वय 73 आहे.मला कॅन्सर, मधुमेह आहे. माझ्या नादी लागशील तर रस्त्यावर पिस्तुल्याने गोळी झाडेन, अशी धमकी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी ही धमकी दिली आहे. यावेळी माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख हे देखील उपस्थित होते.















Discussion about this post