जळगाव । शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली असून मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर शिक्षकांना पैसे वाटप केल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी हे आरोप केले आहेत. तसेच त्यांनी निवडणूक आयोग कुठं आहे? असा प्रश्नदेखील उपस्थित केला आहे.
सुषमा अंधारे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले. कुठे आहे निवडणूक आयोग?, असा आरोप त्यांनी केला आहे.
महायुतीचे उमेदवार दराडे यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री @mieknathshinde यांची जळगावातील आदित्य लॉन्स येथे सभा झाली. सभेनंतर जिल्ह्यातील आलेले प्रत्येक शाळेचे शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांना पैसे वाटप करण्यात आले.
कुठाय निवडणूक आयोग? @MahavikasAghad3 @ECISVEEP pic.twitter.com/QHT3j0jJIK— SushmaTai Andhare (@andharesushama) June 22, 2024
येत्या 26 जून रोजी निवडणूक
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होणार आहे. यानिमित्त काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी रात्री जळगावातील आदित्य लॉन येथे सभाही घेतली. या सभेला जळगाव-धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला उपस्थित होते. मात्र सुषमा अंधारे यांच्या आरोपाने आता खळबळ उडाली आहे.















Discussion about this post