तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४५० पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही पदे स्वच्छता कर्मचारी आणि उप कर्मचाऱ्यांची आहेत.
जे इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट centralbankofindia.co.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. २१ जून पासून ते २७ जून पर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. २७ जून शेवटची तारीख आहे.
या रिक्रूटमेंटच्या माध्यमातून सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांची एकूण ४८४ पदे भरली जाणार आहे. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १०वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या सफाई कर्मचारी पदासाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषा चाचणीद्वारे केली जाईल. ऑनलाइन परीक्षा आयबीपीएसद्वारे घेतली जाईल. तर स्थानिक भाषा परीक्षा बँकेद्वारे घेतली जाईल. परिक्षेच्या गुणवत्तेवर निवड आधारित असेल. ऑनलाइन परीक्षा ७० गुणांची तर स्थानिक भाषा चाचणी ३० गुणांची असेल.
जनरल कैटेगरी मधील लोकांना या पदासाठी अर्ज करायला असल्यास ८५० रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच SC, ST, PH आणि माजी सैनिक श्रेणीतील उमेदवारांना १७५ रुपये शुल्क भरावे लागेल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झाली नाही. अधिक माहितीसाठी तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.















Discussion about this post