पुणे : पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावाजवळ एक भीषण अपघात झाला. अजित पवार गटाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्याने सुसाट कार चालवत दुचाकीस्वाला चिरडलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे.
फॉर्च्युनर कार विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला धडकली. दोन्ही गाड्यांची धडक इतकी भीषण होती की एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कारने दोघांना चिरडल्यानंतर आमदार यांचा पुतण्या मयूर मोहिते हा कारमध्येच बसून होता.
रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका कारच्या डॅशकॅममध्ये मयूर मोहिते कारमध्ये बसल्याचं रेकॉर्ड झालं आहे. स्थानिक नागरिक घटनास्थळी आल्यानंतर त्यांनी मयूरला गाडीतून बाहेर काढलं.अपघतानंतर ओम भालेरावच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीसात तक्रार दाखल केलीय. दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्यूला कारणीभीत ठरल्या प्रकरणी मंचर पोलिसात आमदार पुतण्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातानंतर मंचर पोलीस स्टेशनला तणापूर्ण परिस्थिती होती.















Discussion about this post