नवी दिल्ली । दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. एका दिवसापूर्वी कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता.
मात्र आज शुक्रवारी या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. ईडीने उच्च न्यायालयात केजरीवाल यांच्या जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनावर सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली. पण नंतर दिल्ली हाय कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन आठवड्यांचा जामीन मंजूर केला. राऊज अवेन्यू कोर्ट अंतिम निर्णय घेणार आहे. अरविंद केजरीवाल यांचा जेल बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यापूर्वी सुप्रीम कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी 10 मे पर्यंत अंतरिम जामीन दिला होता. 2 जून रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सरेंडर केलं. सरेंडर करण्याआधी अरविंद केजरीवाल सुप्रीम कोर्टात गेले होते. केजरीवाल यांनी कोर्टाकडे आपला अंतरिम जामीन सात दिवसासाठी वाढवण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने केजरीवाल यांच अपील धुडकावलं.















Discussion about this post