वसई : मुंबईतील वसईमध्ये काळजाची थरकाप उडवणारी घटना समोर आलीय आहे. वसईत भररस्त्यात प्रियकराने लोखंडी पान्याने प्रेयसीची हत्या केली. धक्कादायक म्हणजेच प्रियकराकडून प्रेयसीवर हल्ला होत असताना लोक फक्त बघतच राहिली. दरम्यान, हत्या करतानाचा व्हिडिओ सोशल साम टीव्हीच्या इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला आहे.
वसई पूर्व चिंचपाडा परिसरात आज सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. नालासोपारा इथं राहणारी आरती रामदुलार यादव (२२) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर रोहित यादव (२९) असे आरोपीचे नाव आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहत होते. दोन वर्षांपासून ते दोघेही रिलेशनशिपमध्ये होते
View this post on Instagram
पण तरुणीने ब्रेकअप केल्याच्या रागातून प्रियकराने तिची हत्या केली.प्रियकराने भररस्त्यात लोखंडी पाना मारण्यास सुरुवात केली. तरुणीला मारहाण करताना घटनास्थळी एकच गर्दी झाली.एका व्यक्तीने या प्रियकराला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा व्यक्ती या संतापलेल्या प्रियकराला रोखू शकला नाही. या प्रियकराने प्रेयसीवर हल्ला सुरुच ठेवला. या हल्ल्यात या तरुणीचा मृत्यू झाला आहे. यावेळी रस्त्यावरील लोकही प्रियकराकडे फक्त पाहत राहिले. हत्या करताना घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी मोठ्या प्रमाणात होती. मात्र, या तरुणीला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाही, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.















Discussion about this post