Saturday, May 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात टँकरने १५ वर्षीय मुलाला चिरडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 18, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

पाचोरा : जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून यात अनेकांना प्राणास जीवावर मुकावे लागत आहे . आता अशातच पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका टँकरच्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली. राजवीर नरेंद्र भोसले (वय १५ रा. आमडदे ता. भडगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते.

राजवीरचे वडील नरेंद्र भोसले हे आमडदे गावात राहतात. नरेंद्र भोसले यांचा वैद्यकीय व्यवसाय असल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी दि. १७ जून रोजी नरेंद्र भोसले हे पाचोरा येथे पत्नी, मुलगा राजवीर आणि मुलगी यांच्यासह काही कामानिमित्त आलेले होते. त्यानंतर रात्री दहा वाजेनंतर घरी आमडदे येथे परत जात होते. वाटेत बांबरुड फाट्याजवळ पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

दुचाकीवरून सर्व खाली पडले. त्यात राजवीर हा जवळून जाणाऱ्या टँकर खाली येऊन चिरडून ठार झाला आहे. डोळ्यादेखतच मुलाचा मृत्यू झाल्यामुळे भोसले परिवाराला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान राजवीर आणि जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. तेथे राजवीर याला मयत घोषित करण्यात आले. तर नरेंद्र भोसले, त्यांच्या पत्नी व मुलीला किरकोळ खरचटल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान सदर अपघाताबद्दल पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी दि. १८ जून रोजी पहाटे ७ वाजेपर्यंत काहीही दाखल नव्हते. या भीषण अपघातामुळे रस्त्यांच्या दुर्दशेचा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे. पोलिसांनी टँकर हे जप्त केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

NEET पेपर लीक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली, NTA आणि केंद्राकडून उत्तर मागितले

Next Post

रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची संधी ! 10वी पाससाठी तब्बल 1104 पदांसाठी भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय रेल्वेत परीक्षेशिवाय नोकरीची उत्तम संधी, 10वी पास, ITI उत्तीर्णांसाठी संधी..

रेल्वेमध्ये परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची संधी ! 10वी पाससाठी तब्बल 1104 पदांसाठी भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
रेल्वेत १०वी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी! तब्बल ६००० पेक्षा जास्त जागांसाठी भरती, आताच अर्ज करा

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी मोठी संधी! रेल्वेत १६४४ पदांची भरती, परीक्षेविना होणार थेट निवड

May 9, 2026
12वी पाससाठी खुशखबर! जळगाव पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई’ पदांसाठी भरती जाहीर

जळगाव एसपी बंगल्यावरील सुरक्षेत हलगर्जीपणा; दोन अंमलदार निलंबित, पोलीस विभागात खळबळ

May 9, 2026
लाच घेताना न्यायाधीशालाच पकडलं; न्यायपालिका क्षेत्रात खळबळ

जळगाव PWD मध्ये लाचखोरीचा पर्दाफाश; ५ लाखांची लाच घेताना शाखा अभियंता जेरबंद

May 9, 2026
अरे बापरे: मुख्याध्यापकांच्या बँक खात्यातून लांबविले लाखो रुपये

चोपड्याचे निवृत्त प्राध्यापक सायबर भामट्यांच्या जाळ्यात; ‘ब्लॉक ट्रेडिंग’च्या नावाखाली तब्बल १५.५० लाख लुटले!

May 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page