पारोळा । कर्जबाजारीपणाला कंटाळून पारोळा तालुक्यातील सार्वे बु. येथील शेतकऱ्याने शेतात जात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडलीस आली. संजय कृष्णा पाटील (वय ५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सार्वे बु. (ता. पारोळा) येथील संजय कृष्णा पाटील हे शेती करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करत होते. त्यांनी शेतीसाठी सोसायटीचे कर्ज काढले होते. तसेच काही जणांकडून हातउसनवारीने पैसे घेतले होते. मात्र शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे याची चिंता होती. यातूनच त्यांनी १४ जूनला सकाळी त्यांच्या (Farmer) शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तत्काळ पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथून धुळे येथे नेण्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र दुपारी १ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान सदर घटनेची नोंद पारोळा पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.















Discussion about this post