तुम्हीही बँकेत नोकरी शोधात असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरतीद्वारे तब्बल 3 हजार पदे भरली जाणार आहेत. शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांपूर्वी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही वाढून देण्यात आली. आता या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अवघा एकच दिवस शिल्लक राहिला आहे.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 जून 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. nats.education.gov.in या साईटवर जाऊन उमेदवारांना अर्ज करावी लागतील. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारासाठी पार पडत आहे. यासोबतच वयाची अटही भरती प्रक्रियेसाठी लागू करण्यात आलीये. नुकताच पदवी घेतलेले उमेदवार देखील या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून गेल्या काही दिवसांपासून अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. यासोबत सध्या बँक ऑफ बडोदामध्येही भरती प्रक्रिया सुरू आहे. बँक ऑफ बडोदाच्या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आपल्याला बँकेच्या साईटवर मिळेल.
Discussion about this post