जळगाव। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत समान संधी केंद्राचे उद्धाटन महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नाशिक येथील प्रादेशिक सहसंचालक भगवान वीर, समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी उपायुक्त राकेश महाजन, विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील, समाजकल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. एस. आर. कोल्हे, या केंद्राचे समन्वयक प्रा.राकेश रामटेके उपस्थित होते. यावेळी डॉ.नारनवरे यांनी सांगितले की, या समान संधी केंद्राच्या माध्यमातून शिक्षण संस्था व सरकार यांनी मिळून कार्य केल्यास विद्यार्थ्यांना विविध योजना व संधीची माहिती होऊन रोजगारसक्षम तरुण निर्माण होतील व एक नवीन राष्ट्र निर्माण करता येईल. त्याकरीता सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे असे ते म्हणाले. सूत्रसंचालन डॉ.दीपक सोनवणे यांनी केले.
विद्यापीठात स्थापन झालेल्या या समान संधी केंद्रात प्रा. राकेश रामटेके हे समन्वयक आहेत. या केंद्रात १२ विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करतील. हे विद्यार्थी कनिष्ठ विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांची माहिती देतील. शिष्यवृत्ती अर्ज भरणे, मुदतीत अर्जांवर कार्यवाही करुन घेणे, इ. कार्यवाही मुदतीत केल्याने शासनाकडून मार्च अखेरीस विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळेल. प्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी प्रशाळेतच सोडविल्या जाव्यात असे अपेक्षित आहे. यावेळी ए.आर.काझी यांच्यासह प्रशाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.















Discussion about this post