नवी दिल्ली । नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून त्यांच्यासोबत काही खासदारांना मंत्रिपदासाठी शपथ दिली जाणार आहे. यासाठी त्यासाठी आता पंतप्रधान कार्यालयातून मंत्र्यांना फोन केले जात आहे. सध्या तरी महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना फोन आला आहे. दरम्यान, खासदार प्रतापराव जाधव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याचे संजय गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यांनाही पंतप्रधान कार्यालयातून फोन आला आहे.
गेल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्या असून त्या राज्यातील एकमेव महिला नेत्या ठरल्या. यातच मंत्रीपदाच्या दावेदार असणार्या डॉ. भारती पवार, डॉ. हिना गावित, नवनीत राणा आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे रक्षाताई खडसे यांचा दावा अजून मजबूत झाला.
यात आज नरेंद्र मोदी यांचा शपथविधी होणार असून यावेळी त्यांच्यासोबत काही खासदारांना शपथ दिली जाणार असून त्यासाठी अशा खासदारांना सकाळपासून दिल्लीतून फोन केले जात आहे. यात रक्षा खडसे यांना देखील मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन केला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. या माध्यमातून प्रदीर्घ काळानंतर जळगाव जिल्ह्यास मंत्रीपदाची संधी मिळणार आहे.















Discussion about this post