जळगाव । ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून दिवसेंदिवस यात वाढ होत चालली आहे. अशातच आता जळगावातील बांभोरी येथील अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणाला ऑनलाइन टास्क घेऊन झटपट पैसे कमवण्याचा लोभ लागला. त्यात निवृत्त झालेल्या वडीलांच्या बँक खात्याचे डिटेल त्याने घेतले. पीएफ आणि ग्रॅच्युएटीचे तब्बल १२ लाख रुपये सहा दिवसात ऑनलाइनमध्ये गुंतवल्याने फसवणूक झाली.
बांभोरी येथील ३१ वर्षिय अभियांत्रिकी पदवीधर तरुणासोबत हा प्रकार झाला. राहुल भागवत सोनवणे (वय ३१, पत्रकार कॉलनी, बांभोरी) या अभियांत्रिकी पदवीधर तरुणाच्या मोबाइलवर ३१ मे रोजी व्हॉटसअॅप ९७९३४४१३१३ व टेलिग्रामवरील @ Linda Marty८९८५ या आयडी क्रमांकावरून संपर्क करून
ऑनलाइन टास्क देऊन व्हीडीओ लाइक व शेअर केल्यास प्रत्येक व्हीडीओ मागे १२३ रुपये मिळतील असे सांगण्यात आले. सुरुवातीला राहुलने हजार रुपये गुंतवले. त्याचे त्याला १३०० रुपये मिळाले.
ही रक्कम वाढवत जावून गुतंवणूक केली. त्याचे वडील एसटी महामंडळातून काही दिवसांपूर्वी निवृत्त झाल्याने त्यांच्या वडीलाच्या पीएफ व ग्रॅच्युएटीचे बँक खाते तोच ऑपरेट करत होता. एसबीआय बँक खात्यातून ११,४३,९९९ रुपये त्याने अवघ्या सहा दिवसात (५ जून) गुंतवले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने ६ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता सायबर पोलिसात फिर्याद दिल्यावरून अनोळखीक्रुिद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस निरिक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.















Discussion about this post