नाशिक । राज्यात अपघाताच्या घटना सातत्याने समोर येत असून यात अनेकांना जीवावर मुकावे लागत आहे. अशातच आता नाशिकमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सकाळच्या सुमारास ट्रॅव्हल बस व ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात १ जणाचा जागीच मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झालेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या येवला तालुक्यातील देशमाने गावाजवळ हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 1 जण ठार तर 7 जण गंभीर जखमी झालेत. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जालना जिल्ह्यातील काही भाविक त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत होते. दर्शनावरुन परत येताना देशमाने गावाजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रॅव्हल बस रस्त्याच्या कडेला शेतात घुसली.
याबाबतची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात ट्रॅव्हल्य चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ७ जण जखमी झालेत. जखमी झालेल्या रुग्णांना येवला येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.















Discussion about this post