जळगाव । शहरातील नंदनवन नगरातील दयावान गौतम सोनवणे या २७ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. दरम्यान याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही.
जळगाव शहरातील नंदनवन नगर परिसरात दयावान सोनवणे हा तरूण आपल्या आईवडील, भाऊ आणि पत्नी यांच्यासोबत वास्तव्याला होता. मजूरीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गुरूवारी ६ जून रोजी रात्री जेवण करून तो राहत्या घरातील वरच्या खोलीत जावून झोपला होता. तर घरातील इतर सर्वजण घरात खालच्या घरात झोपलेले होते. दरम्यान, मध्यरात्री दयावान याने वरच्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली. शुक्रवारी ७ जून रोजी सकाळी ७ वाजता त्याचा लहान भाऊ कुंदन हा उठविण्यासाठी गेला असता त्याला भाऊ दयावान याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. शेजारी राहणाऱ्या तरूणांच्या मदतीने खाली उतरवून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ माधुरी सोसे यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला. दयावान याला आठ दिवसांपुर्वीच मुलगी झाली होती. घरात आनंदाचे वातावरण असतांना तरूणाच्या जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे.















Discussion about this post