जळगाव | जळगाव शहर महानगरपालिकेला नवे आयुक्त मिळाले आहे. मनपाच्या आयुक्तपदी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश राज्य शासनाचे उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी गुरुवार 6 जून रोजी सायंकाळी 5 वाजता आदेश काढले आहे.
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून जळगाव महानगरपालिकेची आयुक्तपदी असलेल्या विद्या गायकवाड यांची बदली करण्यात आले होते तेव्हापासून जळगाव महानगरपालिकेचे आयुक्तपद रिक्त होते. या रिक्त जागेवर सांगली येथील जिल्हा प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसे आदेश राज्य शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी गुरुवार 6 जून रोजी सायंकाळी 5 वाजता आदेश काढले आहे. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारुन तसा अहवाल शासनास पाठवावा, असे निर्देश देखील आदेशात दिले आहे.















Discussion about this post