चोपडा । जळगाव जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण काही केल्या कमी होत नसून दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत चालले आहे. त्यात अवैध वाळू वाहनधारकांच्या बेभानमुळे अनेकांना जीव गमवावा लागलाय. अशातच चोपडा तालुक्यात झालेल्या अपघातात ३० वर्षीय तरुण ठार झाला आहे.
वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणार्या 30 वर्षीय तरुणास धडक दिल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ हा अपघात घडला असून राजेंद्र झिंगा धनगर (30, रा.कमळगाव ता. चोपडा) असं मृत तरुणाचं नाव आहे.
अडावद कृषी विद्यालयाजवळ राजेंद्र झिंगा धनगर हा तरुण पायी चालत असताना वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली. यात त्याच्या डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी (29, रा. सुटकार ता. चोपडा) यास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मृत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परीवार आहे.
Discussion about this post