बुलढाणा : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील विविध भागात वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. या पावसाचा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर परिसरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काढणीला आलेल्या केळीच्या बागा अक्षरशः उध्वस्त झाल्या आहेत. तर विद्युत पुरवठा करणारे खांब पडल्याने गेल्या १४ तासापासून परिसरातील विद्युत पुरवठा खंडित आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक परिसरात ४ जूनला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यात जिल्ह्यातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर या परिसरात रात्रभर पावसाच्या सरी सुरूच होत्या. संग्रामपूर तालुक्यातील दानापूर खुर्द, काकणवाडा, कोलद, काटेल या परिसरात वादळी वाऱ्याने शेतीचे मोठं नुकसान झाल आहे. तर मोठ्या प्रमाणात आलेल्या वादळी वाऱ्या आणि पावसामुळे काढणीला आलेल्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत.
शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
अनेक शेतकऱ्यांच्या (Farmer) केळीच्या बागा या उध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल आहे. तर परिसरातील अनेक ठिकाणी वृक्ष कोलमडल्याने व विद्युत पुरवठा करणारे खांब कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या चौदा पंधरा तासापासून या परिसरात वीज पुरवठा खंडित आहे. त्यामुळे शेतीला पाणी देण्यास शेतकऱ्यांना अडचण होत आहे.















Discussion about this post