जळगाव। रावेर लोकसभा मतदार संघात भाजपने विजयी परंपरा कायम ठेवली आहे. रावेरमधून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सून भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी ३ लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळवत विजय निश्चित केला आहे. त्यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटीलांचा पराभव केला आहे.
यंदाच्या वेळी रक्षा खडसेंना उमेदवार मिळेल कि नाही याबाबत मोठी चर्चा होती. मात्र पक्षाने त्यांना पुन्हा संधी देऊन उमेदवारी जाहीर केली. त्यांच्याविरुद्ध भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले श्रीराम पाटील उभे होते.
रावेर लोकसभा मतदार संघात विधानसभा निहाय पहिले असता सर्वाधिक मतदान हे मलकापूर विधानसभा क्षेत्रात झाले आहे. भुसावळ मतदार संघात सर्वांत कमी मतदान झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र रावेर लोकसभा मतदार संघात लेवा पाटीदार समाज हा मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा फायदा निश्चितच रक्षा खडसे यांना झाला असल्याने रक्षा खडसे यांना ६ लाख २१ हजार ९४७ तर श्रीराम पाटील यांना ३ लाख ६ हजार १६८ इतके मते मिळाली आहेत. अर्थात रक्षा खडसे यांना चांगले मताधिक्य रक्षा खडसे यांना मिळाले आहे.















Discussion about this post