मुंबई । मुंबईत एक धक्कादायक घटना घडली असून IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या मुलीच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या घटनेने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची माहिती आहे. त्यातून काही माहिती समोर येऊ शकतो. मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.लिपी रस्तोगी असं आत्महत्या करणाऱ्या मुलीच नाव आहे. मृत मुलगी LLB च शिक्षण घेत होती. ती 27 वर्षांची होती. तिचे वडील विकास रस्तोगी हे शिक्षण विभागात महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत
या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारली तेव्हा ती खाली उभ्या असलेल्या बाईकवर कोसळली आणि जागीच तिचा मृत्यू झाला. आयएस अधिकाऱ्याच्या मुलीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने या घटनेची चर्चा होते आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनसैर्गिक मृत्यूची नोंद करुन पुढील तपास सुरु केला आहे.















Discussion about this post