मुंबई : आगामी आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्षानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजेच विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यपद्धतीवर अनेक नेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात असल्यामुळे त्यांना प्रदेशाध्यपदावरून हटवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न होत असल्याचं दिसून आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाचा विचार करताना जातीय समीकरण देखील लक्षात घेतलं जाऊ शकते. दलीत चेहरा मुंबई काँग्रेससाठी दिल्याने आता मराठा किंवा ओबीसी नेत्याचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी विचार केला जाऊ शकतो. काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष म्हणून अशा नेत्याची गरज आहे जो आगामी निवडणुकीत यशस्वी काम करुन दाखवेल.
प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेतील नावं
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अशोक चव्हाण, सुनील केदार, सतेज पाटील, यशोमती ठाकूर यांची नावं चर्चेत आहेत.