जळगाव : दुचाकीला भरधाव वेगाने गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुचाकीवरील अन्य एक जण जखमी झाला आहे. हा अपघात जळगाव तालुक्यातील वावडदा गावाजवळ घडला. यामुळे मार्गावरील वाहतूक खालंबली होती.
जामनेर तालुक्यातील वाकोद येथील पवन वैजनाथ मंगरूळे (वय २५) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान गावातील राहुल ऊर्फ शुभम लक्ष्मण सोनवणे (वय २५) याच्यासह पवन हा १ एप्रिलला वावडदा येथे आला होता. येथील काम आटोपल्यानंतर दोघेही मित्र दुचाकीने सायंकाळी पाचच्या सुमारास जळगाव शहराकडे येण्यासाठी निघाले. याच दरम्यान म्हसावद गावापुढे भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
जोरदार धडक दिल्याने दोघेही तरुण रस्त्यावर फेकले गेले. यात पवन मंगरूळे याचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल ऊर्फ शुभम सोनवणे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले होते. तेथे प्रथमोपचार झाल्यावर राहुल याला खासगी रुग्णालयात हलवले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.















Discussion about this post