राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल काही वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे. सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जाता. त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात. एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.आता निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली आहे. एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
असा पाहा MHT CET 2023 रिझल्ट?
निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या
cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा
त्यानंतर Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा
रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा
रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा
राज्य प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) एमएचटी सीईटी 9 ते 21 मे या कालावधीत घेण्यात आली. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स ग्रुपची (पीसीएम) परीक्षा 9 ते 13 मे दरम्यान घेण्यात आली होती. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ग्रुपची (पीसीबी) परीक्षा 15 ते 20 मे या कालावधीत पार पडली होती. पीसीएम आणि पीसीबीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या होत्या. पहिल्या सत्राची परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसऱ्या सत्राची परीक्षा दुपारी 2 ते 5 या वेळेत झाली होती.