मुंबई : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर उशीर करू नका, कारण सोन्या आणि चांदीची किंमत उच्च पातळीच्या दरापेक्षा कमी झाली आहे. आठवड्याच्या पहिल्या व्यवहार दिवशी आज भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.
काय आहे आजचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोन्याचा भाव ११५ रुपयांनी घसरून ५९,७०७ रुपयांवर आला असून चांदीच्या दरातही घसरणीसह व्यवहार होत आहे. एमसीएक्सवर चांदी ४४० रुपयांनी स्वस्त झाली असून प्रति किलो भाव ७३,३५६ रुपयांवर आला आहे. जागतिक घडामोडींमुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव येत आहे.
विक्रमी पातळीवर सोने आणि चांदी मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्यामुळे अनेक तज्ञांनी मौल्यवान धातू खरेदीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅम ५५ हजार ४०० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ६० हजार ४५० रुपये आहे. तर, एक किलो चांदीची किंमत ७४ हजार ५०० रुपये खर्च करावा लागेल.