सिंधुदुर्ग । पुणे आणि नगरमध्ये बोट उलटल्याची घटना ताजी असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. वेंगुर्ले बंदरात बोट उलटल्यामुळे सात खलाशी बुडाले होते. त्यापैकी तिन खलाशांनी पाहून किनारा गाठला, त्यामुळे त्यांच्या जीव वाचला. यापैकी चार खलाशी बेपत्ता होते. त्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहिम सुरू करण्यात आली. तेव्हा त्यातील दोन खलाशांचे मृतदेह सापडले आहेत. तर दोघेजण अजूनही बेपत्ता आहेत.
सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यामुळे काल रात्री या खलाशांची बोट समुद्रामध्ये उलटली आहे. बेपत्ता खलाशांचा शोध अद्यापही जारी आहे. या घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु इतर दोन खलाशांची अजून काहीही माहिती मिळालेली नाही. घटनास्थळी शोधमोहिम सुरू आहे. बेपत्ता खलाश्यांचा शोध घेतला जात आहे.
नगर जिल्ह्यातील घटना
अहमदनगर जिल्ह्यात बोट बुडाल्याची घटना २२ मे रोजी समोर आली होती. SDRF पथकाचे जवान प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी शोधकार्य करत असताना अचानक SDRF पथकाची बोट अचानक उलटली. या घटनेत तीन जवान नदीत बुडाले. त्यांचा मृत्यू झाला. या बोटीवर असलेला एक स्थानिक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.
पुण्यातील घटना
पुण्यातील इंदापूर तालुक्यात २१ मे रोजी भीमा नदीत बोट बुडाल्याची घटना (Boat Capsized) घडली होती. नदीतील बोट उलटल्यामुळे ६ प्रवासी पाण्यात बुडाले होते. त्यानंतर बुडालेले प्रवासी आणि बोटीचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ पथक घटनास्थळी दाखलं झालं होतं. एनडीआरएफच्या पथकाला नदीत बुडालेली बोट ३५ फूट खोल पाण्यात सापडली होती. नदीत बुडालेल्या प्रवाशांचा शोध सुरू होता.
Discussion about this post