मुंबई/जळगाव : एकीकडे मान्सूनचे वेध लागले असता यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान वाढीने कहर केला असून यामुळे उष्णतेच्या लाटेत नागरिक होरपळून निघत आहे. राज्यातील काही शहरांनी तापमानाची 45 ओलांडली आहे. राज्यात जळगाव आणि अकोला शहरे सर्वाधिक हॉट शहरे ठरली आहे. गुरुवारी जळगाव शहरांचे तापमान 45.3 तर अकोला शहराचे तापमान 45.5 अंश सेल्सियस होते.
अकोला आणि जळगाव शहर हॉट सिटी म्हणून ओळखले जाते. यंदाचा उन्हाळ्यातील अकोल्यात गुरुवारी उच्चांक तापमानाची नोंद झाली. तर दुसरीकडे जळगावमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. तसेच यवतमाळ 43.05, अमरावती 43.2, चंद्रपूर 43.2, वर्धा 43.02 आणि नागपुरात 41.9 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. पुढील काही दिवसासाठी पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
वाढलेल्या तापमानामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, जळगावसह काही जिल्ह्यात हवामान खात्याने अजून तीन दिवस तापमान वाढलेले असणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असा सल्ला दिला आहे. कामानिमित्त घराबाहेर पडत असाल तर डोक्यावर टोपी, रुमाल, गॉगल आणि पाण्याची बॉटल घेऊनच घराबाहेर पडण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Discussion about this post