जळगाव । खान्देशात गेल्या आठवडाभरापासून तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच आता सगळ्यांना मान्सूनच्या पावसाचे वेध लागले आहे. सध्या मान्सूनसाठी अत्यंत सकारात्मक स्थिती असून, यंदा चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे खान्देशात १४ ते १७ जून दरम्यान मान्सून पोहोचेल असा अंदाज आहे;
परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. त्यामुळे रेमल नावाचे चक्रीवादळ तयार होत असून, ते भारतीय किनारपट्टीवर धडकले तर त्याचा मान्सूनवर परिणाम होऊ शकतो. ते म्यानमारच्या दिशेने वळले तर कदाचित मान्सूनला आणखी विलंब होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान अभ्यासक यांनी दिली. रेमल चक्रीवादळ श्रीलंकेकडे वळले तर मान्सूनची गती वाढेल आणि मुसळधार पाऊस पडेल, या काळात राज्यात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात. हे वादळ पूर्णपणे सक्रिय होण्यासाठी अजून ४८ तासांचा अवधी आहे. त्यानंतर संभाव्य परिणाम समोर येतील.
दिवसभरातील तापमान सकाळी ७ वाजता (३० अंश), सकाळी ८ वाजता (३९), सकाळी ९ वाजता (३३), सकाळी १० वाजता (३६), सकाळी ११ वाजता (४१), दुपारी १२ वाजता (४१), दुपारी १ वाजता (४२), दुपारी २ वाजता (४३), दुपारी ३ वाजता (४४), दुपारी ४ वाजता (४५), सायंकाळी ५ वाजता (४४), ६ चाजता (४२), रात्री ७ वाजता (४९), रात्री ८ वाजता (४०)
Discussion about this post