दिनेश कार्तिक म्हणजेच DK ने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दिनेश कार्तिकने याची घोषणा केलेली नाही. पण लाइव्ह टीव्ही प्रक्षेपणादरम्यान दिनेश कार्तिकने आयपीएलचा प्रवास संपवला असल्याची माहिती देण्यात आली. आपल्या 16 वर्षांच्या IPL प्रवासात कार्तिक 6 IPL संघांसाठी खेळला. एलिमिनेटर सामन्यानंतर कार्तिकने ज्या प्रकारे आपल्या संघसहकाऱ्यांना भेटून प्रेक्षकांना अभिवादन केले, त्यावरून आता कार्तिकचा आयपीएल प्रवास संपुष्टात आल्याचे निश्चित झाले आहे.
बुधवारी (22 मे) आयपीएल 2024 एलिमिनेटरमध्ये आरसीबीचा राजस्थानकडून पराभव झाल्यानंतर, अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने सूचित केले की हा त्याचा शेवटचा आयपीएल सामना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील प्लेऑफ (एलिमिनेटर) सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभूत झाल्यानंतर, दिनेश कार्तिकचा आयपीएल प्रवास संपवत असल्याची लाइव्ह टीव्हीवर घोषणा करण्यात आली. यावेळी दिनेश कार्तिकने त्याचे किपिंग ग्लोव्हज काढले, चाहत्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले. स्टेडियममध्ये डीके, डीकेच्या घोषणाही देण्यात आल्या.
एलिमिनेटर सामन्यात रोव्हमन पॉवेलने राजस्थानसाठी विजयी धावा काढताच 38 वर्षीय दिनेश कार्तिकने विराट कोहलीला मिठी मारली. कार्तिकने अद्याप आयपीएलमधून निवृत्तीची अधिकृत पुष्टी केली नसली तरी जिओ सिनेमाने जारी केलेला फोटो आणि आयपीएलने जारी केलेल्या व्हिडिओवरून कार्तिकने आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याचे समजते.
धोनीने डिसेंबर 2005 मध्ये चेन्नई येथे श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले. धोनीचे वनडे पदार्पण डिसेंबर 2004 मध्ये बांगलादेशविरुद्ध चट्टोग्राम येथे झाले होते. तथापि, धोनी आणि डीकेचे टी-20 पदार्पण त्याच सामन्यात होते, जो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेला होता.
Discussion about this post