पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदा घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. अखेर बारावी परीक्षेचा निकाल आज मंगळवारी दुपारी 1 वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. यावर्षी राज्यात 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली, ज्याचा आज निकाल लागेल.
यावर्षी बारावीच्या परीक्षा १ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये पार पडल्या. महाराष्ट्रातून यंदा बारावीची परीक्षा तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. परीक्षेनंतर निकालाची विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता लागली होती. अखेर आज बारावी परीक्षेचा निकाल लागत आहे.
दरम्यान, मंडळाने नुकताच बारावीच्या निकालाची एकूण टक्केवारी जाहीर केली आहे. यंदा राज्यात तब्बल ९३.३७ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. बारावीच्या निकालात यंदा ही मुलींनी बाजी मारली आहे.
विभागनिहाय निकाल
कोकण : 91.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के
मुंबई : 91.95 टक्के
कुठे पाहता येणार निकाल?
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
Discussion about this post