इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईस आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दोल्लाहियान यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. यात दोघांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणी माध्यमांनी केला आहे. हेलिकॉप्टरचा ढाचा देखील आढळल्याचे समोर आले आहे.
इराणची राज्य वृत्तसंस्था ‘IRNA’ च्या वृत्तानुसार, राष्ट्राध्यक्ष रायसी हे इराणच्या अझरबैजान रिपब्लिकच्या सीमेवरील धरणाच्या उद्घाटनासाठी गेले होते. उद्घाटन समारंभ संपल्यानंतर परत जात असताना रविवारी वराजकान भागात त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले.
या हेलिकॉप्टरमध्ये तीन अधिकारी, एक इमाम, फ्लाइट आणि सुरक्षा क्रू सदस्यांसह नऊ जण होते. यामध्ये इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रायसी, परराष्ट्र मंत्री होसैन अमीर अब्दुल्लाहियन, पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर मालेक रहमती, इमाम मोहम्मद अली अलीहाशेम, तसेच एक पायलट, को-पायलट, क्रू प्रमुख, सुरक्षा प्रमुख आणि अंगरक्षकाचा समावेश होता.
बचाव कर्मचारी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जात असलेले हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी क्रॅश झाले त्याठिकाणी पोहोचले आहेत. मात्र, हेलिकॉप्टरमधील लोकांची स्थिती काय आहे हे एजन्सीने सांगितले नाही.
Discussion about this post