जळगाव : गेल्या महिनाभरापासून जिल्ह्यात कडाक्याचे ऊन कायम असून, अजून आठवडाभर तरी जळगावकरांना कडाक्याच्या उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यातच आगामी आठवडाभर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. येत्या चार दिवसांत पारा ४७ अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे
शनिवारी जळगाव शहर व जिल्ह्यात पारा ४३ अंशांवर कायम होता. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात हवामान विभागाकडून वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, ठराविक भागांमध्येच पावसाने हजेरी लावली, तर पारा मात्र ४२ अंशांच्या पुढेच राहिला होता. त्यातच १५ ते १८ किमी वेगाने वारे वाहत असल्याने, उष्ण झळा अधिकच जाणवत आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत उष्ण झळा जाणवत आहेत. त्यातच वातावरणात ६० टक्क्यांपेक्षा आर्द्रतेचे प्रमाण असल्याने असह्य उकाडादेखील जाणवत आहे.
जळगाव जिल्ह्यात उष्ण वाऱ्यांमुळे तापमानाचा पारा वाढतच जात आहे. वातावरणामुळे हैराण झालेल्या जळगावकरांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
Discussion about this post