नवी दिल्ली : देशात २०१४ पासून मोदी सरकारची सत्ता असून गेल्या या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाहीये. मोदींकडे पत्रकार परिषद घेण्याची हिंमत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच पत्रकार परिषद का घेत नसल्याचं स्पष्ट केलंय.
पंतप्रधान मोदींना इंडिया टुडे या वृत्तसमुहाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत मोदींना प्रश्न करण्यात आला की, ते गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या तुलनेत आता पत्रकार परिषद का घेत नाहीत. मुलाखतीही कमी का देत आहेत? या प्रश्नाला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले, मीडियाचा वापर एका विशिष्ट मार्गाने झालाय आणि त्या मार्गावर जाण्याची त्यांची इच्छा नसल्याचं मोदी म्हणाले. तरी आपण मुलाखती देण्यास कधीही नकार दिला नाहीये, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. आजची माध्यम पूर्वीसारखे राहिलेले नाहीत, असं ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान मोदी म्हणाले.
‘मला खूप मेहनत करायची आहे. मला गरीबांच्या घरी जायचं आहे. मी रिबन कापून माझा फोटो जाहिरातीमध्ये लावू शकतो. तसेच विज्ञान भवनात मी फोटो काढून तेथे लावू शकतो, पण मी हे करत नाही. मी झारखंडच्या एका छोट्या जिल्ह्यात जातो. तेथे काही काम करतो. त्यामुळे आपण एक नवीन वर्क कल्चर घेऊ आलो आहोत. ते कल्चर योग्य वाटत असेल तर प्रसारमाध्यमांनी ती योग्य पद्धतीने मांडावी, किंवा पटत नसेल तर करू नये. पण आज मीडियाचे हे वेगळे अस्तित्व राहिलेले नसल्याचं मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी मी आजतकशी बोलायचो, पण आता मी कोणाशी बोलतोय हे प्रेक्षकांना समजले आहे. प्रसारमाध्यमे ही आता वेगळी संस्था राहिलेली नाही. इतर अनेकांप्रमाणे तुम्ही (अँकर) वृत्त निवदेकांनाही तसेच बनवले आहे. लोकांना त्यांची विचारधारा माहितीये.
काही सेकंदांनंतर मोदी गमतीने म्हणाले,’या निवडणुकीत अधिकाधिक लोकांनी मला पाहिले. तर ते मला आजतकवर पाहतील.’ ते म्हणाले की, पूर्वी मीडियाच संवादाचं एकमेव साधन होते, परंतु आता संवादाची नवीन माध्यमे उपलब्ध झाली आहेत. पुढे मोदी म्हणाले की, ‘आज तुम्हाला जनतेशी बोलायचे असेल तर संवाद साधण्याचे अनेक मार्गद आहेत. आज जनता माध्यमांशिवायही आपला आवाज सर्वाना ऐकवू शकतो. ज्याला उत्तर द्यायचे आहे, ती व्यक्ती माध्यमांशिवायही आपली मते चांगल्या पद्धतीने मांडू शकते, अशं पंतप्रधान मोदी म्हणाले.
Discussion about this post