जळगाव । राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी व सहकारी बँकांना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २०२४-२५ खरीप व रब्बी हंगामात ४ हजार कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी जिल्ला बँकेने आतापर्यंत ३१९ कोटीवर पीक कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले आहे.
खरीप हंगामात खते, बियाणे व पेरणीसाठी पीक कर्जाची आवश्यकता असते. जिल्हा बँकेसह इतर बँकेकडून शेतकरी पीक कर्ज घेतात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पीक कर्जाच्या दरात ६ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.
केळीसाठी हेक्टरी १ लाख ४ हजार ५०० रुपये, बागायत कपाशी ५० हजार ६०० तर कोरडवाहू कपाशीसाठी ४४ हजार रुपये प्रती हेक्टरी पीक कर्ज मिळणार आहे. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने चालू हंगामासाठी अल्प मुदत पीक कर्जाचे पीकनिहाय कर्जदर, पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसायांना खेळत्या भांडवलासाठी दर निश्चित केलेले आहेत. नाबार्डच्या सूचनेनुसार जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीने पीकनिहाय हेक्टरी कर्ज व पशुसंवर्धन तसेच मत्स्य व्यवसायासाठी कर्ज मर्यादा ठरवली आहे. त्याला जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.
पीक लागवडीचे प्रत्यक्ष क्षेत्र पाहणी केल्यानंतरच कर्ज वाटप करणाच्या जिल्हा बँकेने सूचना दिल्या आहेत. ५० लाखांवरील अनिष्ट तफावत असलेल्या संस्थांच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना बैंक थेट अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा १ एप्रिलपासून करत आहे. खरीप पीक कर्जासाठी संस्था पातळीवरील सभासदांची कर्ज परतफेड तारीख व बँक पातळीवरील संस्थेची कर्ज परतफेड तारीख ३१ मार्च २०२५ अखेर राहील. जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने निश्चित केलेल्या कर्जदारापेक्षा जास्त दराने शिफारस केल्यास, उचल दिल्यास अशा कर्जावर व्याज परतावा मिळणार नाही, कोरडवाहू खरीप पिकांसाठी पीक कर्ज वितरण करण्यासाठी शेवटची तारीख ३० सप्टेंबर ही आहे
५१ हजार रुपयांचे शेतकऱ्यांना मिळाले पीक कर्ज
जिल्हा बँकेला खरीप व रब्बी हंगामात ९२०९ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्यात ९३२ कोटी खरीप तर २७८ कोटी रब्बी हंगामाचे आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत ५१ हजार ५७७ शेतकऱ्यांना ३११ कोटी ३८ लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयीकृत, ग्रामीण, खासगी बँकांकडूनही पीक कर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे.
Discussion about this post