मुंबई : सूर्यावर मोठा स्फोट झाला आहे. आदित्य एल-१ आणि चांद्रयान-२ ने सूर्याची काही भयंकर छायाचित्रे घेतली आहेत. सूर्यावर झालेल्या स्फोटामुळे नवं संकट येणार का, याचा पृथ्वीवर नेमका काय परिणाम होणार आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
काही महिन्यांपूर्वी भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ यान पाठवले होते. आता याच आदित्य एल-१ आणि चांद्रयान-२ ने सूर्याची काही भयंकर छायाचित्रे घेतली आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या फोटोमध्ये सूर्यावर अतिशय मोठा स्फोट झाल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होण्याची ही पहिली वेळ नाही. सूर्याच्या पृष्ठभागावर सौरवादळामुळे स्फोट होतात. सौर स्फोट किंवा सौरवादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट होऊन मोठ्या सौर ज्वाळा तयार होतात.
सनस्पॉट म्हणजे काय?
सूर्याच्या पृष्ठभागावर ज्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक असते, तिथे गडद डाग तयार होतात. सनस्पॉट्स हे सूर्याच्या पृष्ठभागावरील तात्पुरते डाग आहेत. सनस्पॉट तयार झाल्यावर त्याच ठिकाणी स्फोट होतात. असे स्फोट सूर्यावर होत असतात.
सर्यावरील स्फोटांचा पृथ्वीवर काय परिणाम होणार?
सौर वादळ म्हणजे सूर्याच्या पृष्ठभागावर होणारे स्फोट. यामुळे तयार झाले चुंबकीय बल आणि सौरवादळे ताशीलाख किलोमीटर वेगाने वातावरणात पसरतात. अशी सौर वादळे अवकाशातील कण शोषून घेत पुढे सरकतात. ही सौरवादळे पृथ्वीवर आदळतात तेव्हा त्यांचा सॅटेलाईट नेटवर्क, टीव्ही, रेडिओ कम्युनिकेशन आणि जीपीएस प्रणाली यावर परिणाम होतो.















Discussion about this post