नाशिक । महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्याच मतदान पार पडत आहे. त्याचवेळी एक व्हिडिओ समोर आलाय. त्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये शिंदे गटाकडून पैसे वाटले जात असल्याचं म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फक्त दोन तासांसाठी नाशिक दौऱ्यावर आले होते, मग पोलीस इतक्या जड बॅगा का वाहत आहेत? असा सवाल राऊतांनी विचारला आहे.
या बॅगांमधून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदीआ णि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे. आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्वीटर) संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या नाशिक दौऱ्याचा व्हिडीओ ट्वीट केला आहे.
मुख्यमंत्री खाऊ घेऊनआलेतोक्षण!
नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस…
दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत?
यातून कोणतामाल नासिकला पोहचला?
निवडणूकआयोग फालतू नाकाबंदीआणि झडत्या करत आहे.महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरुआहे.
@ECISVEEP pic.twitter.com/2gOaPxVeZm— Sanjay Raut (@rautsanjay61) May 13, 2024
काय म्हणाले संजय राऊत?
मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण! नाशिक मध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्या साठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहातआहेत? यातून कोणतामाल नासिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे, अशी पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उतरले आहेत. रविवारी रात्री १० वाजता मनोहर गार्डन हॉटेलमध्ये शिंदेंनी युतीतील नाराज असलेल्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. हॉटेलच्या रूममध्ये वन टू वन चर्चा करून स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनधरणी करण्याचे प्रयत्न केले. यावेळी उदय सामंत देखील त्यांच्यासोबत होते.
Discussion about this post