पुणे : पुण्यामध्ये सीबीआयने मोठी कारवाई करत जमीन परतावा देण्यासाठी 8 लाखाची लाच घेताना IAS अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त अनिल रमोड यांना लाच घेताना पकडलं आहे. या कारवाईमुळे अख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, सीबीआयने अनिल रमोड यांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा सगळा व्यवहार हायवेच्या लगत असलेल्या एका जमिनीबाबत होता. अनिल रामोड सातारा, सोलापूर आणि पुणे या तीन जिल्ह्यातील भूसंपादनाच्या अपिलवर निकाल द्यायचे, यात ते भुसंपादनाचा मोबदला वाढून देताना 1 कोटीला 10 लाख मागायचे, असा आरोप ऍडव्होकेट याकूब साहेबू तडवी यांनी केला आहे. तडवी यांनची याबाबत सीबीआयकडे तक्रार दिली होती.
दरम्यान, या कारवाईनंतर सीबीआयनं रामोडच्या पुण्यातील दोन घरी छापेमारी केली. या छाप्यात अंदाजे तब्बल 6 कोटींची रोकड सापडली तसंच 14 बेहिशेबी मालमत्तांचे पेपर्स सापडलेत. त्याची किंमत अद्याप निश्चित केलेली नाही. अटक आरोपींना आज शिवाजीनगर, पुणे (महाराष्ट्र) येथील सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
Discussion about this post