लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे आज धुळे जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. आज दुपारी 3 वाजता उद्धव ठाकरे मुंबईकडून जळगावकडे रवाना होणार आहेत. दुपारी 3.45 वाजता जळगाव येथे त्यांचे आगमन होईल. दुपारी 3.45 वाजता जळगाव येथून हेलिकॉप्टरने उद्धव ठाकरे धुळ्याकडे रवाना होतील. 4.15 वाजता धुळे येथे त्यांचे आगमन होणार आहे.
धुळे-जळगावात ठाकरेंची तोफ धडाडणार
आज 4.30 वाजता धुळे लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. त्यानंतर 5.15 वाजता उद्धव ठाकरे जळगावकडे रवाना होतील. सायंकाळी 6.00 वाजता जळगावचे ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे. या दोन्ही सभांमध्ये उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Discussion about this post