नवी दिल्ली । बॉलिवूडची क्वीन कंगना राणौने राजकारणात उडी घेतली असून तिला यावेळच्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी येथून भाजपची उमेदवारी मिळाली आहे.कंगना सध्या जोरदार प्रचारात व्यस्त आहे. या निवडणुकीत आपला विजय होईल, असा विश्वास तिला वाटतोय. दरम्यान, यानंतर एका मुलाखतीदरम्यान कंगनाने चित्रपट, लोकसभा निवडणूक आणि राजकारण याविषयी मत मांडले. त्याचवेळी कंगनाने तिच्या फिल्मी करिअरबाबत एक मोठी घोषणा केली.
काय म्हणाली कंगना ?
ही लोकसभा निवडणूक जिंकल्यास मी हळूहळू शोबिझचे जग सोडू शकते, असे संकेत कंगनाने दिले. मला फक्त एकाच कामावर लक्ष केंद्रित करायला आवडेल, असे तिने स्पष्ट केले. चित्रपट आणि राजकारण कसे सांभाळेल ? असा प्रश्न कंगनाला विचारण्यात आला. ‘मी चित्रपटात अभिनयही करते, भूमिकाही करते आणि दिग्दर्शनही करते. निवडणुकीत जिंकले आणि राजकारणात येण्याची शक्यता दिसली तर मी राजकारणच करेन. खरंतर , मला एका वेळेला एकच गोष्ट करायला आवडेल, असे कंगनाने स्पष्टं केलं.
लोकांना माझी गरज आहे, असं मला वाटलं तर मी त्याच दिशेने पाऊल टाकेन. ( या निवडणुकी) जर मी मंडीतून विजयी झाले तर मग मी राजकारणच करेन. अनेक चित्रपट निर्माते मला सांगतात, की राजकारणात जाऊ नकोस. पण तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होत असेल तर ते योग्य नाही. मी एक प्रिव्हिलेज्ड आयुष्य जगलं आहे. आता जर मला लोकांशी संवाद साधण्याची, त्यांच्याशी जोडलं जाण्याची संधी मिळत असेल तर मी तीदेखील स्वीकारेन असं ती म्हणाली.
Discussion about this post