बारामती । सध्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचा प्रचार सभा जोऱ्यात घेतल्या जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार हे देखील बारामतीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. याच दरम्यान, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
काय म्हटलं आहे
“स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय…”, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे ‘विचार’ घेऊन राजकारण करतो, असं सांगणाऱ्या अजितदादांना निवडणुकीत मात्र खून, खंडणी, धमकी, अपहरण, मोक्का यांसारख्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची आणि टोळी प्रमुखांची मदत घ्यावी लागतेय…
व्वा दादा व्वा!
सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा… pic.twitter.com/1cOwR6I7Yb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
व्वा दादा व्वा! सामान्य लोकं प्रचार करण्याऐवजी गुंडच अजितदादांचा खुलेआम प्रचार करतायेत आणि या प्रवृत्तीला वेळीच रोखण्यासाठी उद्याचा मतदानाचा दिवस सर्वांत महत्त्वाचा आहे, असंही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. दरम्यान, रोहित पवारांच्या या टीकेला अजित पवार काय उत्तर देतात? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Discussion about this post